रुग्णालयात ऍडमिट आरोपीच्या हातातील बेडी रात्री निघलेली दिसली अन त्यानंतर ..

Spread the love

महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना सोलापूर इथे समोर आलेली असून बेडी काढून पळालेल्या आरोपीला पकडल्यानंतर उपचारादरम्यान त्याने सोबत असलेल्या पोलिसाला चावा घेतला आणि दुसऱ्या एका पोलिसाला पाईपने मारहाण केली शनिवारी हा प्रकार उघडकीस आला असून शासकीय रुग्णालयात ही घटना घडल्याने सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेम संजय हलकवडे ( वय 19 राहणार थोबडे वस्ती देगाव नाका सोलापूर ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रेम हलकवडे याच्या विरोधात सलगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याला अटक करण्यात आली होती. जिल्हा कारागृहात तो आजारी असल्याने उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले होते.

2 फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजता त्याच्या हातातील बेडी काढलेली होती हा प्रकार पोलिस बंदोबस्तासाठी तिथे असलेल्या पोलिसांच्या लक्षात आला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता झटका मारून तो निसटला आणि रुग्णालयाच्या वॉल कंपाऊंड वरून उडी मारून तो पळून गेला होता मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली होती मात्र तो आजारी असल्याने त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

शनिवारी सकाळी त्याने रुग्णालयाच्या खिडकीची मच्छर जाळी हाताने तोडली आणि हाताला लावलेले सलाईन काढून टाकले तसेच खिडकीतील दगडाने स्वतःला मारून घेत आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला त्याला विरोध केला असता त्याने पोलीस कॉन्स्टेबल अतुल राऊत यांच्या मांडीला चावा घेतला आणि त्यांच्यासोबत असलेले पोलिस कॉन्स्टेबल जाधव यांना लोखंडी पाईपने मारहाण केली. सदर प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत असल्याचे समजते.


Spread the love