महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना अमरावती येथे समोर आली असून अवघ्या एक वर्षापूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या विवाहित महिलेला माहेराहून तब्बल दहा तोळे सोने घेऊन ये असे सांगत तिचा छळ सुरू करण्यात आला मात्र इतक्यावरच हा प्रकार न थांबता तिच्या पतीच्या कथित प्रेयसीने तिला तुझा पती घटस्फोट घेऊन माझ्याशी लग्न करणार आहे असा मेसेज देखील तिला फेसबुक वर पाठवला. तिचा मेसेज वाचताच विवाहित महिला हादरून गेली आणि तिने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
उपलब्ध माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणी सुमित कारेमोरे ( वय 31 ), प्रभाकर कारेमोरे ( वय 66 दोघेही राहणार भंडारा ) व एका महिलेच्या विरोधात रविवारी गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ‘ 16 फेब्रुवारी 2021 रोजी तक्रारदार महिला हिचे सुमित कारेमोरे याच्यासोबत लग्न झाले होते त्यानंतर ती भंडारा येथे सासरी गेली मात्र लग्नात हुंडा दिला नाही दागिने दिले नाही म्हणून माहेराहून तू दहा तोळे दागिने घेऊन ये ‘ असे सांगत तिचा छळ सुरू झाला. सोने न आणता तू तशीच परत आली तर तुला घरातून हाकलून देऊ, अशा देखील धमक्या देण्यात येत होत्या असे तिचे म्हणणे आहे.
पीडितेने पुढे म्हटले आहे की, ‘ लग्नापूर्वी दिलेल्या बायोडाटामध्ये पती सुमित कारेमोरे हा नागपूर विद्यापीठाचा यांत्रिकी अभियंता असल्याचे सांगण्यात आले होते तसेच घरी बावीस एकर शेती आहे आणि वडील निवृत्त अभियंता आहे असे देखील आपल्याला सांगण्यात आले होते तसेच सुमित कारेमोरे याचे वय देखील आपल्यापासून लपवण्यात आले’.
विवाहबाह्य संबधाबद्दल पीडिता म्हणते की, ‘ पति सुमित सोबत आपले विवाहबाह्य संबंध आहेत’, असा एका महिलेने फिर्यादी महिलेला आपल्याला फेसबुकवर संदेश टाकला. तिचे फेसबुक खाते ओपन करून त्यावर एका महिलेने तिला सुमित आणि तिच्या विवाहबाह्य संबंधाचा दाखला दिला आणि तुझा पती आता तुझ्याशी घटस्फोट घेऊन माझ्याशी लग्न करणार आहे ‘ असे म्हटले. त्यामुळे पीडिता व्यथित झाली आणि तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली.