पोलिसांचा फोन आल्यानंतर तरी किमान आपली भाषा चांगली असावी याचे अनेकजणांना भान राहत नाही असाच एक प्रकार बीड जिल्ह्यात समोर आलेला असून मारहाणीच्या प्रकारात मुलाला प्रतिबंधात्मक कारवाई साठी हजर करा असा निरोप देणाऱ्या कॉल करणार्या महिला पोलिसाशी आरोपीच्या पित्याने अश्लील संभाषण केल्याचे समोर आले आहे. सहा फेब्रुवारी रोजी दुपारी गेवराई येथील बाजार तळावर हा प्रकार घडलेला आहे .
तलवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मारहाणीच्या प्रकरणात व दखलपात्र स्वरूपाचा हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. सदर प्रकरण एका महिला पोलीस नाईक यांच्याकडे चौकशीसाठी असताना त्यांनी 5 फेब्रुवारी रोजी एकाचा मोबाईल नंबर घेतला मात्र ज्याच्या विरुद्ध तक्रार होती त्याने त्याच्या वडिलांचा मोबाईल क्रमांक दिला. त्यावर संपर्क करून पोलीस नाईक यांनी तुमच्या मुलाला कारवाईसाठी घेऊन या ठाण्यात घेऊन या असे सांगतले.
समोरून महिला पोलिस बोलते म्हटल्यानंतर तरी या मुलाच्या वडिलांनी किमान सौजन्याने बोलणे अपेक्षित होते मात्र त्यांनी उलट बोलत तुला बघून घेतो तुला काय करायचे आहे ? असे म्हणत धमकी दिली तसेच अश्लील शब्दप्रयोग देखील वापरले. महिला पोलीस नाईक यांनी त्यांना सभ्य भाषेत बोलण्याचा सल्ला दिला मात्र हे कुठल्याही स्वरूपात ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नसल्याने अखेर गेवराई पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आणि त्य अनुषंगाने पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.