महाराष्ट्रात प्रेमप्रकरणातून अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असतात. अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यात समोर आली असून लग्नानंतर रिसेप्शनचा कार्यक्रम सुरू असताना अचानक पोलिस येऊन धडकले आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नवरदेवाला बेड्या ठोकून लॉकअपमध्ये नेऊन टाकले. वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथे हा प्रकार रविवारी घडलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, आरोपी नवरदेव प्रशांत रमेश खैरे याने पीडित एका पीडित युवतीला नागपूर जिल्ह्यातील कवठा गावात त्याच्या ओळखीच्या एकाच्या शेतात मालवाहू वाहनातून गेले होते. तिथे गेल्यानंतर त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला आणि त्यानंतर देखील 27 मे 2021 पासून तर जून महिन्यापर्यंत आरोपी तिच्यासोबत हा प्रकार करत होता त्यातून ती गर्भवती राहिली.
पीडित तरुणीने त्याला लग्नाची गळ घातली मात्र त्याने तिला विश्वासात घेत गर्भपात करून घेण्याचा सल्ला दिला. गर्भपात करण्याच्या गोळ्या आणून देतो असे सांगून ही बाब कुणाला सांगू नकोस, असे देखील तो म्हणाला तर दुसरीकडे त्याने तिला अंधारात ठेवून दुसऱ्याच तरुणीशी थाटामाटात विवाह संपन्न केला. त्याचे लग्न झाल्याची बाब समजताच पीडित तरुणीच्या पायाखालील वाळू सरकली आणि तिला धक्काच बसला. तिने तात्काळ सिंदी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी तरुणाच्या विरोधात तक्रार नोंदवली.
पाच फेब्रुवारीला प्रशांत याने लग्न केले होते आणि सहा तारखेला त्याचे रिसेप्शन सुरू होणार होते मात्र त्याच्या आधीच पोलिसांनी मंडपाबाहेरच सापळा रचला आणि त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. रिसेप्शनच्या दिवशीच नवरदेवाला पोलिस ठाण्याची हवा खावी लागली, या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नलावडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे .