महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना पुणे येथे उघडकीस आली असून लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात ‘ मला तुझ्यात इंटरेस्ट नाही, तू मला आवडत नाहीस’ असे म्हणत विवाहित महिलेचा छळ केल्याचा प्रकार पुण्यात पिंपरी चिंचवड येथे उघडकीला आला आहे. पीडित महिला ही मूळची सातारा तालुक्यातील असून तिने सदर प्रकरणी साताऱ्यात येऊन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, महिलेचा पती रवींद्र दत्तात्रय चव्हाण, इंद्रायणी दत्तात्रय चव्हाण, दत्तात्रय पांडुरंग चव्हाण ( सर्वजण राहणार कोयनानगर प्राधिकरण पिंपरी चिंचवड ) यांनी पीडित महिलेचा छळ केल्याचा आरोप असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी कोमल चव्हाण ( वय 27 राहणार आरफळ तालुका सातारा ) यांनी तक्रार दिली आहे.
पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, ‘ पिंपरी येथील राहत्या घरी चार फेब्रुवारी 2021 ते दोन ऑगस्ट 2021 पर्यंत आपला छळ करण्यात आला. घरी सीबीआर गाडी घ्यायची आहे. माहेराहून तू दहा लाख रुपये घेऊन ये नाहीतर डायरेक्ट गाडी घेऊन ये , ‘ असे म्हणत पतीने मारहाण केली तसेच सासूने देखील तुला नीट स्वयंपाक करता येत नाही म्हणून तू माहेराहून सोने घेऊन ये, ‘ असे म्हणत वारंवार शिवीगाळ केली तसेच दागिने देखील काढून घेतले असे म्हटले आहे.