महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना पालघर जिल्ह्यात समोर आली असून एका अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीवर मागील सहा महिन्यांपासून एका तरुणाने बलात्कार केले आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवून मित्रांच्या मदतीने तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आले असे हे प्रकरण आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मुलीचे वय सोळा वर्ष असून ती महाविद्यालयीन शिक्षण घेत असून हिचे तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात काम करणाऱ्या एका तरुणाशी प्रेम जडले. याच प्रेमसंबंधातून आरोपी प्रियकराने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली आणि मी सज्ञान झाल्यावर आपण लग्न करू असे तिने त्याला सांगितले मात्र त्याने तिच्यासोबत जबरदस्ती करत शरीर संबंध प्रस्थापित केले आणि त्याचा व्हिडिओ देखील काढला.
सदर व्हिडिओ आपल्या हाती आल्यानंतर त्याने हा व्हिडीओ त्याच्या काही मित्रांना देखील दाखवला आणि त्यानंतर त्याचे मित्र देखील या तरुणीला संपर्क करून व्हिडिओ व्हायरल करण्याची भिती दाखवत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत होते असे देखील तपासात समोर आले आहे.