.. अन दुसऱ्या लग्नाची गोष्ट मध्येच संपली , परिसरात हळहळ

Spread the love

महाराष्ट्रात आणि वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यात समोर आली असून एका सुखवस्तू कुटुंबातील पती-पत्नीने अज्ञात कारणाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील कोथळी येथील इब्राहिमपूर शेतशिवारात ही घटना बुधवारी दुपारी उघडकीला आली. सदर प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शिवशंकर रामभाऊ सिरकरे ( वय 26 ) आणि कल्पना शिवशंकर सिरकरे ( वय 35 ) अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. सदर प्रकरणी शिवशंकर करकरे यांचे नातेवाईक विजय संजय सिरकरे यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत शिवशंकर आणि कल्पना यांचे दीड वर्षांपूर्वी दुसरे लग्न झाले होते. मयत शिवशंकर यांच्याकडे त्यांची पहीली पत्नी राहत नव्हती तर कल्पना हिचे देखील शिवशंकर यांच्यासोबतचे हे दुसरे लग्न होते.


Spread the love