पतीचा विरह सहन होईना, महिलेकडून टोकाचे पाऊल

Spread the love

पती-पत्नी म्हटलं की एकमेकांवर प्रेम हे आलंच मात्र दुर्दैवाने एकाचा मृत्यू आधी झाल्यानंतर दुसऱ्याला त्याचा विरह सहन होत नाही असाच एक प्रकार नागपूर जिल्ह्यात समोर आलेला असून कळमेश्वर येथे पतीच्या विरहात पत्नीने आत्महत्या केल्याची घटना सांगवी तोमर येथे उघडकीला आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शोभाबाई भोतमांगे ( वय 56 ) असे मयत महिलेचे नाव असून सोमवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली. शोभाबाई आणि गोपाळराव यांचे कुटुंब सांगवि तोमर येथे राहत होते. त्यांना 34 वर्षांचा एक मुलगा देखील असून काही दिवसांपूर्वी गोपाळराव यांचा मृत्यू झाल्याने शोभाबाई या प्रचंड मानसिक तणावात गेलेल्या होत्या. कोणत्याही कामात त्यांचे मन रमत नव्हते.

सोमवारी संध्याकाळच्या सुमारास त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतले. त्यात त्या जळालेल्या होत्या. त्यांना कुटुंबीयांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र जास्त प्रमाणात भाजलेल्या असल्याकारणाने त्यांचा मृत्यू झाला असून राहुल भोतमांगे ( वय 36 ) यांनी याविषयी कळमेश्वर पोलिस ठाणे इथे खबर नोंदवलेली आहे .


Spread the love