दवाखान्यात काकाला भेटायला आलेली महिला कोण होती ? आजीचे उत्तर ऐकले अन ..

Spread the love

महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना मुंबई इथे समोर आली आहे ज्यामध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून 45 वर्षीय व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मुंबई येथील केईएम रुग्णालयाच्या समोर ही घटना घडली असून भोईवाडा पोलिसांनी राजेंद्र शेट्टी नावाच्या व्यक्तीच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.

वरळी परिसरात राहणाऱ्या बत्तीस वर्षीय युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार, ‘ त्यांची सत्तर वर्षीय आजी पाय घसरून पडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केल्याचे समजतात त्याने रुग्णालयात धाव घेतली. सदर व्यक्ती आणि त्याचे काका हे दोघेही या आजीच्या देखभालीसाठी रुग्णालय परिसरात थांबत होते. याच दरम्यान दोन दिवसांपासून एक महिला काकाला भेटण्यासाठी रुग्णालयात येत होती. तक्रारदार तरुणाने आजीला विचारले असता ती महिला समोरच्या घरात राहत असून तिचे आणि काकाचे प्रेम संबंध आहे असे सांगितले. त्यानंतर काकांनी खाली जाऊन येतो असे सांगून काका खाली गेले आणि पंधरा मिनिटांनी ते परत आले त्यावेळेस ते जखमी अवस्थेत होते ‘.

काकांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयाच्या खाली गेल्यानंतर प्रेयसीच्या पतीने रुग्णालयासमोरील रस्त्यावर काकांवर धारदार शस्त्राने वार केले. असे तरुणाचे म्हणणे असून प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे समजते.


Spread the love