ठाणे हादरले..महिला फिजिओथेरपिस्टला आला वेगळाच अनुभव , नोंदवली पोलिसात तक्रार

Spread the love

महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यात समोर आलेली असून कोपरी येथील एका महिला फिजिओथेरपिस्ट महिलेला अश्लील छायाचित्रे पाठवून तिचा विनयभंग केल्याबद्दल कोपरी पोलिस ठाण्यात एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे.

कोपरी भागात राहणाऱ्या 38 वर्षीय महिला फिजिओथेरपिस्ट असून ठाणे पूर्व भागात त्यांचे क्लिनिक आहे. सात फेब्रुवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे त्या काम करत असताना एका विकृत व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर व्हाट्सअपवर शिवीगाळ केली त्यानंतर संबंधित व्यक्तीने काही पुरुषांची विवस्त्र छायाचित्रे यांच्या मोबाईल वर पाठवून दिली.

अचानकपणे आपल्या मोबाईलवर ही छायाचित्रे आलेली पाहून फिजीओथेरपीस्ट असलेल्या या महिलेला धक्काच बसला आणि त्यांनी पतीला यासंदर्भात माहिती दिली. आरोपीने महिलेच्या पतीला देखील अशाच प्रकारे अश्लील संदेश पाठवले त्यानंतर महिलेने घाबरून कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक दीपक फुलपगारे हे अधिक तपास करत आहेत.


Spread the love