महाराष्ट्र हादरला..पतीसह दोन जणांनी विवाहित महिलेला धरले अन.., आरडाओरडा सुरु झाला

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यात बैरागड गावात उघडकीस आलेली आहे. किरकोळ कारणांवरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला चक्क डिझेल टाकून पेटवून दिले. त्यातील तब्बल 80 टक्के भाजलेली असून अमरावती येथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडित महिलेच्या भावाने धारणी पोलिसात बहिणीच्या कौटुंबिक छळाची तक्रार दाखल केली असून तीन जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, धारणी तालुक्यातील बैरागड गावातील शेख नासीर शेख गफूर ( वय 35 ) याचे गावातच राहणाऱ्या हिना ( वय 28 ) हिच्यासोबत लग्न झाले होते. तिने पती शेख नासीर याला आईवडिलांकडे जाऊन येते असे सांगितले मात्र शेख याने तिला ‘ तू जाऊ नकोस ‘ असे सांगितले यावरून शेख नासीर शेख गफूर आणि त्याची पत्नी हिना या दोघांमध्ये वाद झाला हा वाद विकोपाला गेल्याने शेख नासिर याने त्याचा भाऊ असलेला शेख सद्दाम शेख गफूर ( वय 30 ) व त्याचा भाचा याला तिचे दोन्ही हात पकडायला लावले आणि तिच्या अंगावर डिझेल टाकून माचीसची काडी लावून पेटून दिले.

सदर प्रकरणात पीडित महिला ही 80% भाजलेली असून तिच्या आरडाओरडाने परिसरातील नागरिक जमा झाले आणि त्यांनी आग विझवून तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. महिलाही 80 टक्के भाजलेली असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला पुढील उपचाराकरता धारणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. पोलिसांना तिने आपले बयानी दिले आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी तिला अमरावती येथे पाठवले असून तिचा भाऊ शेख वसीम शेख हाफिज ( वय 22 राहणार वैरागड ) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी पती, दीर आणि भाचा या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


Spread the love