महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून लग्न जमलेल्या तरुणीचे अचानकपणे निधन झाल्याने लग्नासाठी आतुर असलेला तरुण हा नैराश्यात गेला आणि त्याने देखील जंगलामध्ये जाऊन एका झाडावर गळफास घेतला. सात फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यात अवधानी येथे ही घटना घडलेली असून मनोर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अवधानी येथे राहणाऱ्या एका तरुणीसोबत वाडा तालुक्यातील अनिकेत नितीन रिंजड ( वय 21 ) याचे एक वर्षापूर्वी लग्न जमले होते तेव्हापासून तो त्या तरुणीच्या घरीच राहत होता मात्र 2021 मध्ये अचानकपणे या तरुणीचे निधन झाले. त्यानंतर अनिकेत याने देखील या निधनाचा धसका घेतला आणि तो देखील आजारी राहू लागला.
सात फेब्रुवारी रोजी कामावर जातो असे सांगून तो गेला मात्र तो आलाच नाही आणि त्याने जंगलात जाऊन झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मनोर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून पोलीस ठाण्याचे हवालदार किनी हे अधिक तपास करत आहेत.