मोठी कारवाई..स्पा सेंटरमध्येच सुरु होते ‘ नको ते ‘ प्रकार , दरवाजा उघडला तर चक्क..

Spread the love

सोलापूर जिल्ह्यात चक्क मंगल कार्यालयात वेश्याव्यवसाय उघडकीला आल्यानंतर मुंबई येथेदेखील मसाज पार्लरच्या आडून वेश्याव्यवसाय करणाऱ्या कांदिवली येथील डेस्टिनी स्पा सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली असून अनेक दिवसांपासून स्पा सेंटरच्या आड छोट्या खोलीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे.

कांदिवली येथील एमजी रोडवर असलेल्या डेस्टिनी स्पा सेंटर मध्ये मसाज करण्याच्या बहाण्याने वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी बोगस गिऱ्हाईक पाठवून खात्री करून घेतली. त्यावेळी दोन हजार रुपये देऊन बोगस ग्राहकाकडे एका तरुणीला पाठवण्यात आले होते.

ग्राहकाने पथकाला इशारा केला असता पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली त्यावेळी एका खोलीत ग्राहकासोबत आणखी एक तरुणी देखील आढळून आली त्यावेळी त्या तरुणीने ग्राहकाकडून मिळणाऱ्या रकमेपैकी 20 टक्के रक्कम ही तिला देण्यात येत असल्याचे सांगितले तसेच इतर खोल्यांमध्ये देखील आणखी तीन तरुणी आढळून आल्या आणि सेंटर चालवणाऱ्या तरुणीने मॅनेजर मनीकंठ नायडू आणि मालक रंजन शेट्टी यांच्या दबावामुळे वेश्या व्यवसाय करत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी चार तरुणींची सुटका करत नायडू याला बेड्या ठोकल्या आहेत.


Spread the love