महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून नागपूर इथे चक्क आपल्या पतीचा पगार कमी आहे त्यामुळे नैराश्य येऊन एका नववधूने आत्महत्या केली आहे. आपल्या नवऱ्याचा पगार अवघा सहा हजार असल्याचं नववधूला कळल्यानंतर महिन्याभरातच या तरुणीला नैराश्य येऊन तिनं गळफास घेतला आहे. मयत तरुणीचं डिसेंबर महिन्याच्या अखेरीस लग्न झालं होतं मात्र गळफास लावून घेत तिने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. सुसाईड नोटमध्ये उच्चशिक्षित नववधूने आपल्या आत्महत्येचं कारणही सांगितल असून पोलीस तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण ?
मयत तरुणीचे 29 डिसेंबर 2021 रोजी लग्न झालेले होते. गरीब घरातला पती असलेला हरिदास झेडपी शाळेत शिक्षक होता तर दुसरीकडे पत्नी अश्विनी आणि तिच्या कुटुंबातील सगळेच उच्चशिक्षित आणि नोकरीला होते. आपल्या मैत्रिणींप्रमाणे आपलंही लग्न मोठ्या कुटुंबात व्हावं अशी अश्विनीची अपेक्षा होती मात्र तसे झाले नाही.2020 मध्ये हरिदासला सरकारी नोकरी लागली होती. तीन वर्ष तो शिक्षक म्हणून काम करत असून त्याला सहा हजार मानधन मिळत होत.
लग्नानंतर हरिदास आणि अश्विनी जलालखेडा इथे भाड्याच्या घरात राहत होते तर त्यांची आजी देखील त्यांच्यासोबत राहत होती. हरिदास रोज वाढोणामधल्या शाळेत शिकवायला जायचा मात्र दुसरीकडे आपलं लग्न गरीब घरात झालं म्हणून दुःखी असलेली अश्विनी दिवसभर विचारांनी थकून जायची. 31 जानेवारीच्या रविवारी आजी गावाकडे गेलेली असताना अश्विनीनं अखेर गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं.
पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर अश्विनीच्या डायरीत, ‘ साक्षगंध झालेला दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस होता. माझं एका गरीब कुटुंबात लग्न लावून देण्यात आलं. माझ्य सर्व मित्र मैत्रिणी माझ्या गरीब असल्या तरी त्याचं लग्न श्रीमंत घरात लावलं गेलं. त्यांचा उच्चशिक्षित नवरा मुलगा मिळाला. पण माझा अख्खा परिवार उच्चशिक्षित असला, तरी माझं लग्न गरीब घरात लावण्यात आलं ‘ असे लिहलेले होते.