महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना हिंगोली जिल्ह्यात समोर आलेली असून भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेला एका फोटोग्राफरने गजाने मारहाण केली. औंढा नागनाथ येथील मंदिर परिसरात 12 तारखेला ही घटना घडली असून सदर प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, औंढा नागनाथ येथील फोटोग्राफर असलेले मारुती भांडे ( राहणार वासुदेव गल्ली ) आणि गणेश बालाजी वाकोडे ( राहणार गोबाडे ) हे दोघे फोटोग्राफर आहेत. मारुती भांडे हे तीस रुपयांना फोटो काढत होते तर गजानन वाकोडे दहा रुपयांना फोटो काढत होते. तू देखील दहा रुपयाने फोटो का काढत नाही ? असे म्हणत गजानन वाकोडे यांनी मारुती भांडे यांना मारहाण केली त्यावेळी राजश्री भांडे या पतीचा जेवणाचा डबा घेऊन मंदिर परिसरात आल्या . त्यांच्यात भांडण सुरू असल्याचे लक्षात आले त्यावेळी पतीला सोडवण्यासाठी गेलेल्या असताना दुसरा फोटोग्राफर गजानन वाकोडे याने त्यांना गजाने मारून मारहाण करत दुखापत केली.
भांडणाच्या दरम्यान गजानन वाकोडे यांनी राजश्री यांना जीवे मारण्याची धमकी दिली त्या प्रकरणी राजश्री भांडे यांच्या फिर्यादीवरून गजानन वाकोडे याच्याविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पठाण हे करत आहे.