पुण्यात बुधवार पेठेत आरोपी चक्क ब्लेड घेऊनच आला होता अन..

Spread the love

महाराष्ट्रात आणि वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना पुणे येथे समोर आली असून बुधवार पेठ येथे एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेवर एका आरोपीने ब्लेडने वार केले आहेत त्यानंतर नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राज आप्पा सिद्धलिंग अप्पा ( वय 40 राहणार वडारवाडी शिवाजीनगर ) असे आरोपीचे नाव असून फरासखाना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सदर दुर्दैवी घटनेत पस्तीस वर्षाची महिला जखमी झालेली आहे.

बुधवार पेठेतील राहत्या घरासमोर ही महिला शुक्रवारी रात्री थांबलेली असताना आरोपी सिद्धलिंग अप्पा याचा महिलेसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला त्यानंतर त्याने खिशातून ब्लेड काढले आणि तिच्यावर वार केले. आरडाओरडा सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले सदर पीडित महिलेला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करत आहेत .


Spread the love