सुसंस्कृत शहर म्हणून असलेली पुण्याची ओळख गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे शहर अशी बनत चाललेली दिसून येत आहे. पुण्याचा माणूस म्हटल्यानंतर सुशिक्षित आणि सुसंस्कृत असे चित्र डोळ्यासमोर उभे राहायचे मात्र आता पुण्याच्या नावाचा वापर करत चक्क धमकावण्याचा देखील प्रकार समोर आलेला आहे.
सातारा येथे प्रॉपर्टीच्या वादातून एका तरुणाला पुण्यातल्या दोस्तांना बोलावून तुला संपवून टाकीन, अशी धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर सदर तरुण याने शाहुपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी मोसिन शेख ( राहणार शाहूपुरी सातारा ) याच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राहुल सुपेकर ( वय 35 राहणार गुरुवार पेठ सातारा ) आणि मोसिन शेख हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत मात्र प्रॉपर्टीच्या जुन्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू आहेत त्यामुळे मोसिन शेख याने राहुल सुपेकर यांच्या मोबाईल फोन वर फोन करून त्याला शिवीगाळ केली आहे. माझे पुण्यातील दोस्त आणून तुला संपवून टाकील, अशी धमकी दिली. पोलीस सदर प्रकरणी तपास करत आहेत.