एकदा प्रेमात पडल्यानंतर प्रेयसीला इंप्रेस करण्यासाठी माणूस कुठलीही पातळी गाठू शकतो अशीच एक घटना बुलढाणा येथे समोर आली असून खरेदीचा शौक असलेल्या एका प्रेयसीच्या वाढत्या मागण्यांसाठी तिच्या प्रियकराने चक्क दुचाकी आणि मोबाईल चोरी करायला सुरु केले मात्र त्यानंतर त्याला पोलिसांनी पकडले तेव्हा आपण प्रेयसीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या चोर्या करत आहोत असे त्याने सांगितले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शेख शाहरुख शेख फिरोज असे आरोपीचे नाव असून काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील एका टोळीच्या मुसक्या आवळत दुचाकी चोरणाऱ्या एका टोळीच्या आरोपींना अटक केली होती त्यावेळी त्यांच्याकडून काही दुचाकी सह लाखो रुपयांचा माल देखील हस्तगत केला होता त्यावेळी आरोपी शाहरूख याने आपण प्रेयसीला महागडे गिफ्ट देऊन इम्प्रेस करायचो. तिला देखील महागडे गिफ्ट आल्यानंतर आनंद व्हायचा, असे सांगत पण तिच्यासाठी या चोर्या करत होतो असे म्हटले आहे.
शाहरुख शेख प्रेमात आकंठ बुडालेला होता. प्रेयसीला आकर्षित करण्यासाठी महागडी दुचाकी, तितकाच महागाचा मोबाईल आणि महागडे कपडे याची त्याला आणि त्याच्या प्रेयसीला सवय जडली होती. त्यामुळे महागडी लाईफ टाईम मेण्टेन करण्यासाठी त्याने चोरी हा मार्ग निवड झाल्याचे समोर आले आहे. शाहरुख परिसरातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील असून त्याच्या कुटुंबीयांना देखील या घटनेनंतर धक्का बसलेला आहे.
गेल्या काही वर्षांपासून तरुण पिढी उच्चभ्रू लाईफ स्टाईल मेंटेन करण्यासाठी गुन्हेगारीचे मार्ग अवलंबत असल्याचे दिसून आले आहे. यात मंगळसूत्र चोरी, मोबाईल चोरी, सोन्याचे दागिने, हनी ट्रॅप अशा पद्धतीने तात्काळ पैसे मिळून मौजमस्तीत आयुष्य जगायचे असा तरूणाईचा घातक पॅटर्न महाराष्ट्रात रुजू होतो पाहतो आहे.