मोदींनी अन्याय केला..महाराष्ट्रात स्वातंत्र्यसैनिकाच्या विधवा पत्नीची सामूहिक आत्महत्या

Spread the love

महाराष्ट्रात अनेक खळबळजनक घटना समोर येत असताना अशीच एक घटना नवी मुंबई इथे उघडकीस आली आहे.एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या केली असून वाशी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. कुटुंबातील आई, मुलगा आणि मुलीने विष घेऊन सामूहिक आत्महत्या केली आहे. या घटना उघडकीस येताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ट्विटरवर त्यांच्या प्रोफाईलवर त्या स्वातंत्र्यसैनिकाच्या विधवा पत्नी असल्याचा देखील उल्लेख आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मोहिनी कामवानी या 85 वर्षीय महिला आपल्या कुटुंबासोबत वाशी परिसरात राहत होत्या. त्यांच्यासोबत मुलगा दिलीप कामवानी (67 वर्षे) आणि मुलगी कांता कामवानी (61 वर्षे) हे सुद्धा राहत होते. विष प्राशन केल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला होता त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र तिघांचाही मृत्यू झाला.

मोहिनी कामवानी या सातत्याने मोदी यांच्या कार्यशैलीवर सोशल मीडियावरून आवाज उठवत होत्या, त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले ? याबद्दल आता वेगळीच चर्चा सुरु झाली आहे तसेच एप्रिल २०१३ साली त्यांनी आपल्या अटकेच्या विरोधात देखील महाराष्ट्र पोलिसांवर सोशल मीडियातून त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

प्राथमिक माहितीनुसार तिघांनीही आर्थिक नैराश्येतून हे पाऊल उचललं असल्याची चर्चा आहे . उंदीर मारण्याचं औषध प्राशन करुन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र औषध घेतल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही .


Spread the love