रात्री अडीचला मैत्रीण म्हणाली ‘ मी अंकितच्या चायनिज सेंटरला आहे येतोस का ? ‘

Spread the love

महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आलेली असून मध्यरात्रीपर्यंत बारमध्ये दारू पिऊन घरी जाण्याच्या तयारीत असलेल्या व्यक्तीला त्याच्या मैत्रिणीचा रात्री अडीच वाजता फोन आला आणि त्याने तिला भेटायला धाव घेतली मात्र तिथे गेल्यानंतर त्याची जबरदस्त धुलाई करण्यात आली, अशी घटना नवी मुंबई येथे बेलापूर इथे उघडकीला आली आहे. सदर प्रकरणी एका चायनीज सेंटर चालवणाऱ्या व्यक्तीसोबत त्याच्या सहकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, जितेंद्र गुप्ता असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते खारघर येथे राहतात. 9 फेब्रुवारीला जितेंद्र हे बेलापूरमधील एका बारमध्ये मैत्रिणीसोबत दारू पिल्यानंतर बारमधून बाहेर पडले. मैत्रीण निघून गेली मात्र जितेंद्र हे रात्री अडीचच्या सुमारास बारच्या समोर बसलेले असताना मैत्रिणीचा पुन्हा फोन आला आणि तिने आपण बेलापूर गावात अंकित त्याच्या चायनीज सेंटरवर असल्याचे सांगितले आणि त्यांना बोलावून घेतले.

तिच्या बोलण्याला भुलून जितेंद्र यांनी अंकित याच्या चायनीज सेंटरकडे धाव घेतली. त्यांनी जाताना कारमध्ये स्वतः सोबत असलेली महागडी दारू देखील पिण्यासाठी घेतली. चायनीज सेंटरवर गेल्यावर या दारूची एक बॉटल अंकित याने स्वतःसाठी काढून ठेवली त्यानंतर जेवण झाल्यावर मॅनेजर यांनी खाण्याचे तीनशे रुपये बिल मागितले त्यावेळी जितेंद्र यांनी देखील अंकित याने घेतलेल्या दारूच्या बाटलीचा विषय काढला आणि तीन हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर वादावादी सुरू होऊन अखेर अंकित याने तीन हजार रुपये जितेन्द्र यांना देऊन टाकले आणि जितेंद्र यांनी देखील जेवणाच्या बिलाचे तीनशे ऐवजी पाचशे रुपये घे असे सांगून पैसे देत तिथून काढता पाय घेतला.

मात्र जीतेंद्र कारमध्ये जाऊन बसताच पाठीमागून आलेल्या अंकित आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जितेंद्र यांना जबरदस्त मारहाण केली. दरम्यानच्या घटनेत त्यांची सोन्याची चैन देखील गायब झाली. पहाटेच्या सुमारास त्यांना छातीत त्रास होऊ लागला म्हणून रुग्णालयात दाखल केले असता शरीराच्या अंतर्गत जखमा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


Spread the love