मध्यरात्रीच ‘ ते ‘ आले अन धुलाई करून गेले , पतीला बसलाय मानसिक धक्का

Spread the love

महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आलेली असून पतीने चापट मारल्याचा रागातून पत्नीने स्वतःचे भाऊ आणि बहिणीला बोलावून घेतले आणि पतीची जबरदस्त धुलाई केली. नवी मुंबई येथील कोपरखैरणे पोलीस ठाण्यात याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, कोपरखैरणे सेक्टर 4 मध्ये हा प्रकार घडलेला असून तिथे राहणाऱ्या 35 वर्षे तरुणाचे मूळच्या वसई येथील एका 26 वर्षे तरुणीसोबत लग्न झालेले आहे. त्यांना दोन मुले देखील आहेत मात्र त्यांच्यात सतत वादाचे प्रकार सुरू होते. याच कारणातून पती-पत्नीत भांडण सुरू असताना पत्नीने पतीला उलट उत्तर दिले म्हणून त्याने तिच्या कानाखाली वाजवली मात्र त्यानंतर पत्नी घराबाहेर गेली.

रात्री अकराच्या सुमारास तीन मेव्हणे आणि मेहुणी घेऊन आली आणि या चार जणांनी आपल्या बहिणीवर हात का उगारला ? म्हणून पतीला जबरदस्त मारहाण केली. पतीच्या पायावर बांबूने फटके मारल्यामुळे त्याच्या पायाचे हाड फॅक्चर झाले असून त्यानंतर ते चौघेजण त्यांच्या बहिणीला घेऊन निघून गेले आहेत तर परिसरातील नागरिकांच्या मदतीने मारहाणीत जखमी झालेल्या पतिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अचानकपणे मध्यरात्री येऊन धुलाई झाल्यामुळे त्याला मानसिक धक्का बसलेला आहे त्यानंतर त्याने शुक्रवारी घडलेल्या घटनेची तक्रार पोलिसांकडे केली आहे.


Spread the love