गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहर चांगलेच चर्चेत असून सुवर्णा वाजे यांच्यापुढे प्रकरणानंतर प्रकरणासोबतच पिता-पुत्र यांच्या हत्येचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले असून मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांना ‘ चर्चा करायची आहे कारमध्ये बसा ‘ असे सांगून संशयित राहुल जगताप याने शहराबाहेर कार नेली आणि दरम्यान चर्चेतून वाद झाल्याने राहुल यांनी नानासाहेब यांना जोरदार ठोसा मारला त्यात ते बेशुद्ध झाले मात्र त्यानंतर घाबरलेल्या राहुल याने कार निर्जनस्थळी नेऊन त्यांच्या चेहऱ्यावर पाणी मारले आणि त्यांना शुद्धीवर आणले. शुद्धीवर आल्यानंतर ‘ नानासाहेब मला माफ करा ‘ असे सांगत त्याने पुन्हा वाद झाल्याने त्यांचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक खुलासा झालेला आहे.
नाशिक येथील जुन्या पंडित कॉलनीमध्ये सासु पत्नी आणि लहान मुलांसह राहणारा राहुल गेल्या डिसेंबर महिन्यापर्यंत कौटुंबिक तणावाखाली आलेला असल्याने व्यसनाधीन झालेला होता. यातून राहुल जगताप याने 18 डिसेंबरच्या अगोदर जुना गंगापूर नाका इथे नानासाहेब यांना स्विफ्ट कारमध्ये बसवले आणि कारमध्ये वाद घालून त्यांना ठार केले त्यानंतर त्याने पुरावा मिटवण्याच्या उद्देशाने मृतदेह नाशिक जिल्ह्याच्या हद्दीबाहेर आंबोली घाटात नेला आणि दरीत फेकून दिला. नानासाहेब यांच्या अंगावरील कपडे देखील त्याने काढून घेतले होते. फेकलेला मृतदेह दोन झाडांमध्ये अडकला म्हणून राहुल याने वरून दगड भिरकावला मात्र तरी देखील मृतदेह खाली पडला नाही म्हणून राहुल याने तिथे असलेले गवत पेटून पुरावा जाळण्याचा प्रयत्न केला या आगीमुळे अर्धवट जळालेला मृतदेह मोखाडा पोलिसांना दुसऱ्या दिवशी आढळून आला होता.
संशयित राहुल याने नानासाहेब यांचा मुलगा असलेला अमित याला त्र्यंबकेश्वर तालुक्यात निर्जनस्थळी नेऊन डोक्यात दगड घालून ठार मारल्याची देखील बाब पुढे आली. अमित याचा मृतदेह कारच्या पुढील सीटवर ठेवून टी-शर्ट ने बांधला आणि त्याने नानासाहेब कापडणीस यांचा मृतदेह जिथे फेकला तिथे अमित याचा मृतदेह फेकायला नको म्हणून त्याने नगर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करत भंडारदरा रस्त्याने पुढे जात राजूरपासून काही किलोमीटर अंतरावर अमितचा मृतदेह फेकून दिला . तिथे मयत अमित याच्या चेहऱ्यावर दारू उतरली आणि पेटवून देण्याचा प्रयत्न केला आणि तिथून फरार झाला , असे तपासात आतापर्यंत समोर आले आहे.