‘ …म्हणून घरात साठवले होते सॅनिटायझर ‘, डॉक्टर सुवर्णा वाजे जळीतकांडात काय आलंय समोर

Spread the love

नाशिक येथील गाजलेल्या डॉक्टर सुवर्णा वाजे जळीतकांड प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असून वाजे यांचा पती संदीप वाजे याने कोरोनाकाळात जमवलेल्या सॅनिटायझरने आग लावून त्यांची हत्या करण्यात आल्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हत्या प्रकरणाचा सूत्रधार संदीप वाजे त्याचा मावसभाऊ यशवंत म्हस्के याने न्यायालयात सॅनिटायझरचा वापर करून हे जळीतकांड करण्याचा सल्ला संदीप वाजे याला दिला होता असे म्हटले आहे त्यानंतर यशवंत मस्के यांची सहा दिवसांसाठी पुन्हा पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे

डॉक्टर सुवर्णा वाजे यांची हत्या नसून ती आत्महत्या असल्याचा बनाव सदर प्रकरणातला मुख्य संशयित असलेला संदीप वाजे आणि त्याचा मावसभाऊ संशयित बाळासाहेब उर्फ यशवंत रामचंद्र मस्के यांनी केला होता . पोलिसांनी दोघांचा मोबाईल संवाद आणि घटनेच्या दिवशी दोघांमध्ये झालेले 12 ते 14 फोन कॉल यावरून यशवंत मस्के याचा या कटात महत्त्वाचा सहभाग दिसत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले त्यानंतर न्यायालयाने याला पुन्हा सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी प्रमुख संशयित असलेला संदीप वाजे याचा मावस भाऊ यशवंत मस्के याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सॅनिटायझरचा कॅन जप्त केला. संदीप वाजे याने कोरोनाच्या काळापासून आपले हे कृत्य पूर्णत्वास नेण्यासाठी सॅनिटायझरचा साठा केला होत, त्यातील काही त्याने डॉक्टर सुवर्णा वाजे यांना जाळण्यासाठी वापरले असल्याची शक्यता दिसून येत आहे.


Spread the love