महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आलेली असून दोन्ही कुटुंबातील आपसातील संमतीने एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याचे ठरले होते त्यानंतर हा विवाह लावून देखील देण्यात आला मात्र अवघ्या आठ महिन्यात पतीने तिच्या त्याच्या अल्पवयीन पत्नीवर चारित्र्याचा संशय घेण्यास सुरुवात केली त्यानंतर या पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली कैफियत मांडली त्यावेळी हा विवाह बालविवाह असल्याचे समोर आले.
उपलब्ध माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात ही घटना घडलेली असून पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या या विवाहितेनेमुळे अल्पवयात झालेल्या विवाहाचे बिंग फुटले आहे आणि तिचे लग्न लावून देणारे आई वडील मावशी मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पतीविरुद्ध बलात्काराचे कलम लावण्यात आलेले आहे. शनिपेठ पोलिस ठाण्यात सध्या हे प्रकरण आहे.
जून 2021 मध्ये पीडितेचा आई मामा व इतर नातेवाईकांच्या मर्जीने जळगाव शहरात राहणाऱ्या तरुणाशी विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवस पीडिता पतीसोबत त्याच्या मूळ गावी राहिली आणि त्यानंतर जळगाव शहरात आली. जळगावमध्ये आल्यानंतर पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेणे सुरू केले त्यानंतर आठ फेब्रुवारी रोजी ती घरातून निघून दुसऱ्या दिवशी इंदूर शहर येथे रेल्वेने गेली.
तिथे आजीचे घर माहित नसल्याने रेल्वे स्टेशनवर थांबून दुसर्या दिवशी तिने पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक बालकल्याण समितीकडे नेले आणि पूर्ण चौकशी केल्यानंतर पीडित मुलीला 25 फेब्रुवारी रोजी पुन्हा जळगाव येथील बालकल्याण समितीत आणण्यात आले. त्यानंतर तिची चौकशी केली असता तिचा विवाह हा बालविवाह असल्याचे समोर आले. मुलीची आई वडील मामा चुलत मावशी सासू-सासरे पती आणि पतीचे मामा या सात जणांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.