दहावीतील मुलीने पोलिसांना लावले कामाला , तपासात वेगळीच माहिती समोर

Spread the love

शिक्षणासाठी मुलांवर असलेला दबाव ही काही नवीन बाब राहिलेली नाही मात्र बदलापूर येथे एका सोळा वर्षाच्या विद्यार्थिनीने दहावीची परीक्षा ऑफलाईन होणार असल्याने या त्रासातून सुटका व्हावी म्हणून आपले अपहरण झाले असा बनाव रचला होता. सुरुवातीला चार व्यक्तीने तिचे अपहरण केले असे तिचे म्हणणे होते मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिने परीक्षेला घाबरून अपहरणाचा बनाव केल्याचे उघड झाले.

23 फेब्रुवारीला बदलापूर येथील एका विद्यार्थिनींचे अपहरण झाल्याची तक्रार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात देण्यात आली होती त्यानुसार चार व्यक्तींनी तिला बेशुद्ध केले आणि त्यानंतर तिचे अपहरण केले आणि मुंबईला नेले , असे त्यात म्हटले होते. त्यानंतर आपण त्यांची नजर चुकवून पळालो आणि परत आलो असे सांगण्यात आले. वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

तपास करत असताना मुंबईतील परळ या भागातील देखील सीसीटीव्ही तपासण्यात आले मात्र त्यात कुठेच काही संशयास्पद आढळून आल्याने पोलिसांना या मुलीवरच संशय येऊ लागला आणि तिच्या तक्रारी बद्दलच तिला सखोल माहिती विचारण्यात आली असता तिने आपण दहावीत असून परीक्षा ऑफलाईन होणार असल्याने त्या परीक्षेला घाबरून आपण स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला असे म्हटले आहे.


Spread the love