देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना बिहार इथे समोर आलेली असून जमुई जिल्ह्यात एका व्यक्तीने एका विवाहित महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आणि महिलेचे वैवाहिक जीवन पूर्णपणे संपुष्टात आले. याच आरोपीने याआधी देखील दोनदा असाच प्रयत्न करून तिचे लग्न मोडले होते. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पीडितेचे लग्न नवादा जिल्ह्यातील एका मुलासोबत निश्चित झाले होते अन त्यानंतर लईच तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. पोलिस ठाण्यात तक्रारीनंतर जमुई पोलिस आणि सायबर सेलने याप्रकरणी तपास सुरू केला, तेव्हा आरोपीचे नाव रोहित चौधरी असल्याचे समोर आले आणि त्याला नवादा येथून बेड्या ठोकण्यात आल्या .
डीएसपी राकेश कुमार यांनी सांगितले की, नवविवाहित जोडप्याचे काही फोटो मॉर्फ केले गेले आणि एडिट केले गेले आणि नंतर सोशल मीडियावर व्हायरल केले. याप्रकरणी रोहित चौधरी नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुणीला लग्न मोडायचे होते. एवढेच नाही तर पीडितेच्या नावाने फेक फेसबुक आयडी बनवून तो सतत फोटो शेअर करत होता.