महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून धुळे जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीने गळफास घेतल्याची घटना घडलेली आहे. माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला जीवे मारेन अशी धमकी आरोपीने तिला दिली होती त्यानंतर घाबरून गेलेल्या या मुलीने गळफास घेतला असून सदर घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार, धुळे तालुक्यातील खंडलाय बुद्रुक येथे ही घटना घडली असून अश्विनी नगराळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. आरोपी विजय पाटील हा 13 वर्षीय भुवनेश्वरी प्रकाश मोरे हिला सातत्याने त्रास देत होता. तिचा पाठलाग करत तो तिला लग्नाची मागणी घालत होता. माझ्याशी लग्न केले नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी देखील धमकी तो देत असल्याने मुलगी घाबरून गेली होती.
त्याच्या या सततच्या त्रासाला कंटाळून भुवनेश्वरी हिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली त्यात तिचा मृत्यू झाला. आरोपी विजय पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे तर धुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे.