ब्रेकअपनंतर स्टोरी आली ‘ व्यवहारावर ‘ , ४८ वर्षीय व्यक्तीची अजब मागणी

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना जळगाव येथे समोर आली असून शहरात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेला आरोपीने ब्लॅकमेल करत तिच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. सदर महिलेचे आरोपीने वेळोवेळी अत्याचार करून आधी शोषण केले आणि त्याचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले त्यानंतर पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली आणि हे प्रकरण उघडकीस आले.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिला ही जळगाव शहरात ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत असून गणेश प्रकाश चौधरी ( वय ४८ ) असे आरोपीचे नाव असल्याचे समजते. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या आरोपीनं फेशिअल करण्याच्या नावाखाली पीडित महिलेला एका हॉटेलवर बोलावून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आणि त्याचा व्हिडीओ बनवत महिलेकडे पैशाची मागणी केली. जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

गणेश प्रकाश चौधरी हा जळगाव शहरातील तुळसाई नगर परिसरातील रहिवासी असून गणेश यानं काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरून पीडितेशी संपर्क साधला होता आणि त्यानंतर आरोपीनं ओळख वाढवून पीडितेशी चांगली मैत्री केली आणि त्यांच्या प्रत्यक्षात भेटीगाठी देखील वाढल्या.आरोपी गणेश याने महिलेला डी मार्ट परिसरात बोलावून मोबाईल भेट दिला आणि ‘ माझं फेशिअल करुन दे ‘ अशी मागणी करत तिला एका लॉजवर बोलावले . महिलेने तिथे त्याचे फेशियल देखील इथे करून दिल मात्र त्याने तिच्यावर अत्याचार केला.

आपल्यावर अत्याचार झाल्याने घाबरलेल्या महिलेनं आरोपीशी संपर्क तोडला मात्र त्याने अनेकदा माफी मागितल्यानंतर पीडितेनं त्याला मोठ्या मनाने माफ केलं. फेब्रुवारी महिन्यांत आरोपीनं पुन्हा पीडितेला त्याच हॉटेलमध्ये घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि या प्रकारानंतर पीडितेनं आरोपीशी कायमचा संपर्क तोडला मात्र आता ती आपल्याशी बोलणारच नाही हे लक्षात आल्यावर आरोपीने ‘ भेट दिलेला मोबाईल ‘ परत मागायला सुरु केले.

पीडित महिला त्याचा मोबाइल देण्यासाठी गेली असता आरोपीने तिचे अश्लील व्हिडीओ दाखवून पीडितेला शारीरिक संबध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करायला सुरु केले. पीडिता ऐकतच नाही हे लक्षात आल्यावर आरोपीने पीडित महिलेच्या नवऱ्याला 3 मार्च रोजी फेसबुकवर मेसेज करून 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर हतबल झालेल्या दाम्पत्याने रामानंद नगर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली असून आरोपीस बेड्या ठोकण्यात आल्या आहेत .


Spread the love