.. त्याचवेळी घरच्यांनी गांभीर्याने घेतलं असत तर ? एकतर्फी प्रेमातून झालाय खून

Spread the love

महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना गेल्या काही दिवसांपूर्वी घडली होती. एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीचा चाकूने भोसकून खून करणारा आरोपी निखील कुंभार ( वय २५ ) याने एक महिन्यापूर्वीच याच मुलीच्या एकतर्फी प्रेमातून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर आलेली आहे

उपलब्ध माहितीनुसार, मयत मुलीचे नाव पायल साळुंकेअसून तिच्या खुनानंतर रुग्णालयात निखिल याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता मात्र त्यातून तो बचावला असून सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

पोलिसांच्या चौकशीत निखिल याने एक महिन्यापूर्वीच एकतर्फी प्रेमातून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळी घरच्यांनी चर्चा नको म्हणून हे प्रकरण दडपण्याच्या उद्देशाने शेतात औषध फवारणी करताना त्याच्या तोंडात औषध गेले, असे सांगत प्रकरण दडपण्याचे प्रयत्न केला. त्याच वेळी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असले तर एका अल्पवयीन मुलीचा जीव वाचवता आला असता.

निखिल कुंभार याने पायल साळुंके नावाच्या अल्पवयीन मुलीचा खाजगी क्लासमध्ये जाऊन चाकूने वार करत रविवारी खून केला होता. तिचा खून केल्यानंतर त्याने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला त्यानंतर दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता सुधारत आहे. पोलीस चौकशीत त्याने केलेले अनेक चाळे समोर येत असून त्याच्या कृत्याबद्दल परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.


Spread the love