निर्लज्ज कबुली..एकतर्फी प्रेमातून खून प्रकरणात काय आले समोर ?

Spread the love

महाराष्ट्रात सातारा येथे खाजगी क्लासमध्ये घुसून पायल साळुंके ( वय 17 ) या महाविद्यालयीन युवतीचा खून करणाऱ्या निखील कुंभार याने तोंड उघडायला सुरू केले असून वेगवेगळे खुलासे यानिमित्ताने उघड केले आहेत.पंधरा दिवसापूर्वी पायल हिने त्याचा नंबर ब्लॉक केला होता त्यामुळे तिचा खून केल्याची निर्लज्ज कबुली निखिल याने पोलिसांपुढे दिली आहे.

कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील अकरावीत शिकणाऱ्या पायल हिचा 6 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता निखील कुंभार ( राहणार पिंपोडे बुद्रुक कोरेगाव) याने क्लासमध्ये घुसून खून केला होता त्यानंतर निखिल याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपासून निखिल रुग्णालयात उपचार घेत होता त्याची प्रकृती सुधारत असून आता तो एक एक गोष्ट उघड करत आहे .

पोलिसांच्या चौकशीत निखिल याने एक महिन्यापूर्वीच एकतर्फी प्रेमातून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळी घरच्यांनी चर्चा नको म्हणून हे प्रकरण दडपण्याच्या उद्देशाने शेतात औषध फवारणी करताना त्याच्या तोंडात औषध गेले, असे सांगत प्रकरण दडपण्याचे प्रयत्न केला. त्याच वेळी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असले तर एका अल्पवयीन मुलीचा जीव वाचवता आला असता.


Spread the love