देशात एक वेगळीच घटना समोर आलेली असून बिहारच्या जमुई येथे गिद्धौर ठाण्याच्या क्षेत्रातील एका गावातील आपल्या प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी पकडलं मात्र त्यांना मारहाण न करता त्यांचे प्रेमसंबंध असल्याने त्यांचे अखेर लग्न लावून देण्यात आले. तरुणी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी गिद्धौर स्टेशनवर गेली होती आणि इथेच या दोघांना गावकऱ्यांनी पाहिलं आणि यानंतर त्यांना गावात आणलं गेलं.
दोघांकडे चौकशी केली असता, बऱ्याच काळापासून दोघं प्रेमसंबंधात असल्याची माहिती समोर आली तेव्हा मंदिरात या दोघांचं लग्न लावून दिलं यावेळी या तरुणीने आणि तिच्या प्रियकराने मान्य केलं की अनेकदा ते लपून एकमेकांना भेटत होते.आपल्या गावाची आणि आपल्या समाजाची बदनामी नको म्हणून दोन्ही बाजूच्या गावकऱ्यांनी दोघांचं लग्न लावून दिले आहे .
रामजी पासवान ( वय २६ ) असे या युवकाचे नाव असून तो बांका जिल्ह्यातील सुईया येथील रहिवासी आहे. त्याच्या एका भावाच्या जमुई येथे राहणाऱ्या मेहुणीसोबत रामजी याच मागील पाच वर्षांपासून अफेअर होतं. तरुणीच्या आईलाही याची कल्पना होती. त्यांनी अनेकदा एकमेकांसोबत शारीरिक संबंधही ठेवले होते. सोमवारीदेखील युवक आपल्या प्रेयसीला आसनसोल येथे याच कारणासाठी घेऊन जाण्यासाठी आला होता.
तरुणीच्या आईला याबद्दल समजलं आणि वारंवार फिरायला जाण्याच्या नावाने हा युवक आपल्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवत आहे हे लक्षात आलं त्यामुळे तिने गावातील काही लोकांना याबद्दल सांगितलं आणि गावातील लोकांसह ती गिद्धौर स्टेशनवर पोहोचली. याठिकाणहून दोघांनाही पकडून गावात आणण्यात आलं आणि मंदिरातच गावकऱ्यांनी दोघांचं लग्न लावून दिलं.