देशात एक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना मध्य प्रदेशात समोर आली असून इंदूर येथे सरकारी कन्याशाळेत चक्क मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणार्या एका सहाय्यकाला निलंबित करण्यात आले आहे. शिक्षण खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी याबाबत माहिती दिली आहे.
जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी म्हटले आहे की एका सहाय्यकाच्या विरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. बेजबाबदारीने वागणे, शैक्षणिक परिसरात अश्लील व्हिडिओ पाहणे आदी तक्रारींचा देखील त्यात समावेश होता त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी सदर तक्रारींची परिसरात जाऊन पाहणी केली आणि त्या खऱ्या असल्याचे आढळून आले.
शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत त्याला निलंबित केले आहे. तो शाळेत मनमानी पद्धतीने ये जा करायचा तसेच प्राचार्यांच्या आदेशाकडे देखील सतत दुर्लक्ष करत होता. निव्वळ मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहण्याचा त्याला नाद लागला होता, त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे .