खंडणी प्रकरणात संशयीतांना पकडण्यास पोलीस गेले खरे मात्र ..

Spread the love

पोलीस म्हटल्यानंतर नागरिकांच्या मनात एक आदरयुक्त भीती असावी असे चित्र दुर्दैवाने कमी होत असून असाच एक प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे उघडकीला आला आहे. यंत्रमाग कारखानदारांची रोकड लुटणार्‍या संशयित आरोपींना पकडण्यासाठी गेले असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांवर चक्क गोळीबार करण्यात आल्याची घटना उघडकीला आली असून संशयित दोन आरोपींच्या विरोधात आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला असून सुदैवाने कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्याला इजा झाली नाही.

उपलब्ध माहितीनुसार, व्यापारी यांची लूट करण्यात आल्यानंतर लूट करणारे आरोपी संशयित आरोपी जमाल बिल्डर आणि सलमान हे सरदारनगर भागात असल्याची माहिती गुप्त सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांना समजली होती त्यानुसार पोलीस हवालदार सुभाष चोपडा आणि निकुंभ हे संशयित आरोपींना पकडण्यासाठी गेले होते त्यावेळी जमाल बिल्डर याने निकुंभ यांच्या दिशेने गोळीबार केला.

सदर प्रकरणी आयेशानगर पोलिसांनी साजिद अहमद रियाज आली ( वय 24 ) आणि नबी शकील अहमद ( वय 22 ) यांना अटक केली असून नदीम अहमद याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर सदर गुन्ह्यातील आणखी तीन जण संशयित फरार असल्याचे समजते .


Spread the love