महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आली असून एका तरुणाच्या पाठीमागे मधमाशांचा घोळका लागला आणि त्याने मधमाशापासून वाचण्यासाठी एका कालव्यात उडी घेतली मात्र त्यात त्याचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात पवनी नजीक ही घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे.
महेश रघु रेवतकर ( वय 25 राहणार असता जिल्हा वर्धा ) असे मयत व्यक्तीचे नाव असून तो दाजी असलेले भूषण कुंडलिक वैद्य यांच्याकडे राहत होता. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास उजव्या कालव्याच्या पाळीवरून तो शेतावर जात असताना अचानक याच्यावर मधमाशांनी हल्ला केला त्यामुळे घाबरलेल्या महेश याने पळ काढला मात्र अखेर मधमाशा आपल्या पाठी येत असल्याचे पाहून भीतीने त्याने गोसे खुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात उडी घेतली.
पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. सदर प्रकार रस्त्यावरून जाणार्या काही व्यक्तींच्या लक्षात आला त्यांनी प्रयत्नही केला मात्र त्यांना यश आले नाही आणि या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला काही वेळानं काही वेळानंतर मासेमारी बांधवांच्या मदतीने त्याचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला. आपल्या बहिणीकडे राहणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे