महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आलेली असून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या पायावर कोयत्याने वार करून त्यानंतर मनशांती मिळवण्यासाठी हरिद्वार येथे गेलेला आरोपी शंभुनाथ बाबूलाल साहू याला पालघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पालघर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे हे करत आहे.
सफाळे पूर्व भागातील देऊळ पाडा येथे शंभूलाल बाबूलाल साहू हा राहत असून त्याची पत्नी ममता हिचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध असल्याची चाहूल त्याला लागली होती. सतत सांगून पत्नीच्या वागण्यात बदल होत नसल्याने राग अनावर होऊन त्याने मंगळवारी 15 फेब्रुवारी रोजी सगळेजण झोपले असताना ममताच्या पायावर कोयत्याने वार करुन तिथून पळ काढला होता. त्यानंतर पत्नीला दवाखान्यात दाखल करण्यात आले आणि तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला होता.
आरोपी हा साड्या विक्री करण्याचा व्यवसाय करत असल्याने सफाळे पोलिसांचे एक पथक सुरत येथे गेले होते. सुरत येथील साड्यांच्या होलसेल विक्रेत्यांकडे बोलताना शंभुनाथ हरिद्वारला असल्याची माहिती हाती लागली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला त्यावेळी तो देवळात स्वतःची ओळख आणि वेशभूषा बदलून चक्क साधू बनून राहत असल्याचे निदर्शनास आले मात्र पोलीस समोर दिसतात त्याचे अवसान गळून पडले आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.