हॉटेल चालकाच्या मुलाचं अपहरणकांड की वेगळंच ? महाराष्ट्रातील खळबळजनक घटना

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यात मोहोळ नजीक उघडकीला आली असून एका हॉटेल चालकाच्या मुलाचे हॉटेलमध्ये काम करत असलेल्या संशयित आचाऱ्याने अपहरण केल्याची घटना समोर आलेली आहे. अकरा मार्च रोजी ही घटना घडली असून आरोपी विशेष म्हणजे हॉटेल मालक यांच्या नात्यातील आहे. परिसरात शोध घेऊन मुलगा न सापडल्यामुळे हॉटेलचे चालक नागेंद्र शर्मा यांनी पोलिसात फिर्याद दिली असून आरोपीच्या शोधासाठी पोलिस मध्यप्रदेश येथे देखील रवाना झाले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, नागेंद्र शर्मा हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून त्यांनी मोहोळ येथे एक हॉटेल भाडेतत्त्वावर घेतलेले आहे. अंकोली इथे त्यांचे हे हॉटेल असून तिथे शर्मा पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. त्यांचा मावस भाऊ सोनू ओझा हा मूळचा मध्य प्रदेश येथील असून तो शर्मा यांच्या हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होता. हॉटेल चांगले चालत आहे हे त्याला माहीत होते त्यामुळे त्याने याआधी देखील गल्यातील पैसे चोरले होते.

दहा मार्च रोजी हॉटेलचे मालक शर्मा यांच्या पत्नीकडून गावी पैसे पाठवायचे आहेत असे सांगून त्याने वीस हजार रुपये घेतले आणि तो सोलापूरला गेला. 11 मार्च रोजी संध्याकाळी चार वाजता तो पुन्हा आला आणि त्या वेळी त्याच्या सोबत शर्मा यांचा मुलगा अमन हा होता त्यानंतर मात्र अमन आणि दोघेही दिसून आले नाहीत आणि शर्मा यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला त्यांनी परिसरातच कुठेतरी असतील असे सांगून वेगवेगळ्या ठिकाणी विचारपूस केली मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत . ओझा याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता तो बंद आढळून आला आणि त्यानंतर मनोज ओझा यानेच मुलाला पळवले आहे याची अमनची आई सुषमा देवी यांची खात्री झाली त्यानंतर सदर प्रकरणी पोलिसात धाव घेण्यात आली आणि संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस शोध घेत असून वृत्त लिहीपर्यंत ते आढळून आले नव्हते .


Spread the love