‘ ती ‘ बाहेर गेलेली पाहिली अन ‘ तो ‘ घरात घुसला

Spread the love

महाराष्ट्र अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना चोरी करण्यासाठी कुठली शक्कल लढवून कशा पद्धतीने चोरी करेल याचा भरवसा राहिलेला नाही. अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे उघडकीला आली असून शेजारच्या घरात कोणी नसल्याचे पाहून एका युवकाने घरातील तीन लाख 95 हजार रुपये किमतीचे दागिने गायब केले आहेत. तात्काळ कारवाई करत पोलिसांनी संशयित आरोपी अजिंक्य अनिल कांबळे ( वय 20 राहणार लाईफ लाईन हॉस्पिटल मागे दत्तनगर पंढरपूर ) याला बेड्या ठोकल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, घराच्या छतावरील दरवाजाचे कडी-कोयंडा उचकटून अजिंक्य याने घरात प्रवेश केला आणि तीन लाख 95 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले, अशी तक्रार सरिता मिलिंद कांबळे ( लाईफ लाईन हॉस्पिटलमागे दत्तनगर पंढरपूर ) यांनी शहर पोलिसात दिली होती.गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी घराच्या शेजारी राहणारा अजिंक्य अनिल कांबळे याला त्याच्या संशयित हालचालीवरून ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी सगळा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला आहे.


Spread the love