महाराष्ट्रात अनेक लॉजवर अवैध पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या घटना उघडकीला येत असतात. अशीच एक घटना मुंबई येथील मीरारोड येथे उघडकीला आली असून काही लॉज चालक स्वतः वेश्याव्यवसायास प्रोत्साहन देत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. सदर प्रकरणी महिलांचे देखील मोठ्या प्रमाणावर शोषण केले होत असून पोलिसांनी देखील आता सदर गुन्ह्यांवर कारवाईसाठी कंबर कसली आहे. नवघर पोलिस ठाणे हद्दीत भाईंदर पूर्व येथील इंद्रलोक भागात श्री साई रेजन्सी लॉज येथे वेशाव्यवसाय चालू असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली होती.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांना गुप्त सूत्रांच्या माध्यमातून ही माहिती मिळाल्यानंतर पाटील यांनी सुरुवातीला तिथे बोगस गिर्हाईक पाठवले. या ग्राहकाने तेथील पूर्ण माहिती काढत त्याची खबर दिल्यावर उमेश पाटील, विजय निलंगे, केशव शिंदे यांच्या पथकाने कारवाई करत पीडितेची सुटका केली.
सदर प्रकरणी व्यवस्थापक असलेला आणि लॉज मालक शशीइंद्र शेट्टी, मनमत शेट्टी, गणेश शेट्टी, नारायण शेट्टी यांना आरोपी केले आहे. परिसरातील नागरिकांकडून अशाच संदर्भात अनेक तक्रारी केल्या जात असून मीरा-भाईंदर महापालिकेने अनधिकृत बांधकाम असलेल्या अशा अनेक लॉजवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.