महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना लातूर जिल्ह्यातील किल्लारी इथे उघडकीला आली असून किल्लारी पोलीस ठाणे इथे कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने रविवारी पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटांनी रायफलीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, उसने पैसे परत मिळत नसल्याच्या कारणावरून होत असलेल्या त्रासाला वैतागून त्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे ही बाब उघड आली असून त्यानंतर किल्लारी पोलिस ठाण्यात 16 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील समुद्रवाणी येथील साहेबराव सावंत ( वय 38 ) हे किल्लारी पोलिस ठाण्यात पोलिस नाईक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडून धनराज सूर्यवंशी ( तालुका निलंगा ) याने 2017 मध्ये नऊ लाख 50 हजार रुपये उसने म्हणून घेतले होते मात्र ते पैसे परत देत नसल्याने सावंत हे प्रचंड मानसिक दबावात गेले होते त्यातूनच त्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.