देशात अनेक ठिकाणी प्रेम प्रकरण उघड झाल्यानंतर दोन्ही परिवारामध्ये वाद झाल्याच्या घटना घडतात मात्र कधीकधी ग्रामीण पातळीवर प्रेम करणाऱ्या जोडप्यांना जमावाकडून देखील मारहाण केली जाते अशीच एक घटना झारखंड येथे उघडकीला आली असून दुमका जिल्ह्यातील मसलीया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेला आणि पुरुषाला अनैतिक संबंधाचा आरोप करून गावभर नग्न फिरवल्यानंतर झाडाला बांधून मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आलेली आहे.
सदर प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून इतरांचा देखील शोध सुरू आहे. जमावाने केलेल्या या मारहाणीनंतर सदर महिला आणि पुरुष यांना दवाखान्यात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. सुनील मंडल असे या व्यक्तीचे नाव असून तो एका आदिवासी महिलेचा सोबत बोलत असायचा त्यामुळे ग्रामीण पातळीवर ग्रामस्थ त्याच्याकडे संशयित नजरेने पाहत होते. पीडित महिला आणि पुरुष दोघेही विवाहित असून रविवारी ते बोलत असताना त्यांच्यावर अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी त्यांना पकडून ठेवले .
सुनील मंडल त्याच्या शेतातून परत येत असताना गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि आम्हाला विवस्त्र करून मारहाण केली तसेच नग्न अवस्थेत फिरवले, असे देखील पीडित महिलेचे म्हणणे आहे तर पोलिसांच्या वतीने दोषींवर कारवाई केली जाणार आहे असे सांगत पीडितेचे सदर व्यक्तीशी अनैतिक संबंध नव्हते तर त्यांच्यात केवळ मैत्री होती, असे देखील सांगण्यात आलेले आहे.