महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी इथे समोर आलेली असून असून शहरातील एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ करत तिच्यावर चक्क चाकूने हल्ला करण्यात आला आहे. पीडित महिलेने पोलिसात पतीच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. विशेष म्हणजे महिलेचा पती देखील पोलिस दलात कार्यरत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मोनाली सुधीर कांबळे ( वय 30 ) असे चाकू हल्ला झालेल्या विवाहितेचे नाव असून तिचा पती सुधीर कांबळे हा शहरातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. पती याने आपल्या हातावर चाकूने वार केले आणि आपल्याला जखमी केले असे त्यांचे म्हणणे असून पोलिसांनी पती सुधीर कांबळे सासू आणि आणि तीन नणंदा अशा एकूण पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
मोनालीला तिचा पती सुधीर हा सातत्याने त्रास देत होता आणि बापाकडून पैसे घेऊन ये असे सांगत तुझ्याकडून घरातले काम होत नाही म्हणून मारहाण देखील करत होता, असेदेखील पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. 12 मार्च रोजी पतीने आपल्यावर चाकूने वार केले आणि जखमी केले असे पीडित महिलेने म्हटलेले आहे. पत्नीने दिलेली तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनी आरोपी पती सुधीर विठ्ठलराव कांबळे ( वय 30 ) सासु सुनिता विठ्ठलराव कांबळे (वय 55 ) आणि तीन नणंदा अशा एकूण पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.