महाराष्ट्रात एक वेगळीच घटना अकोला जिल्ह्यामध्ये समोर आलेली असून अकोला शहरातील आदर्श कॉलनीमधील शाळेत शिकत असलेल्या 14 वर्षे मुलीला अभ्यासाच्या कारणावरून वडील रागावले म्हणून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. तिने तसा निर्णय घेतला म्हणून तिच्या वर्गातील आणखी एका मुलीने देखील घर सोडण्याचा निर्णय घेतला. दोघींनीही 9 मार्च रोजी शाळा संपल्यावर शाळेतच दप्तर ठेवले आणि शाळेतूनच पळ काढला. सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कैलास टेकडी परिसरातील दोन मुली आदर्श कॉलनीतील एका शाळेत शिकत आहेत त्यातील एका मुलीला अभ्यासाच्या कारणावरून वडील रागावले होते म्हणून तिला राग आला आणि त्यातून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. सदर गोष्ट तिने आपल्या एका मैत्रिणीला देखील सांगितली आणि आणि तिने देखील तिच्यासोबत घर सोडण्याचा निर्णय पक्का केला.
दोघीही वर्गातच दप्तर ठेवून पळून गेल्या त्यानंतर शाळेच्या एका शिक्षकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.काही तासात या मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले असून त्या परभणी येथील रेल्वे स्थानकावर सापडल्या होत्या त्यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. परीक्षेचे वातावरण असल्याने मुलीने अभ्यास करावा म्हणून वडील तिला रागावले होते त्यातून तिने हा उपद्व्याप केल्याचे समोर आले आहे.