पतीच्या अनैतिक संबंधाची माहिती पत्नीला समजली अन ..

Spread the love

देशात घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना नवी मुंबईत पनवेल परिसरात उघडकीला आली असून घटस्फोट देण्यास नकार देणाऱ्या विवाहितेला पती आणि त्याच्या नातेवाईकांनी जबर मारहाण करून फिनेल पाजण्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे. पनवेल तालुक्यातील हेदुटणे इथे ही घटना घडलेली असून पीडित महिलेला एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार शारदा जल्ला ( वय 35 ) असे या महिलेचे नाव असून ती पनवेल तालुक्यातील हेदुटने गावात पती आणि दोन मुलांसह राहत आहे. शारदा हिचा पती शिवचरण जल्ला याचा ट्रान्सपोर्ट आणि कुरिअरचा व्यवसाय असून त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती शारदा यांना समजली होती. त्यामुळे पती-पत्नीत वाद झाले आणि शिवचरण याने मला घटस्फोट देऊन टाक, अशी तिच्याकडे मागणी केली.

शारदा यांनी घटस्फोट देण्यास नकार दिला म्हणून आठ मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास शिवचरण घरांमध्ये असताना त्याचे आई वडील, मावशी, नणंद हे आलेले असताना शिवचरण यांनी आपल्याला जबरदस्तीने फिनेल पाजण्याची शारदा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शारदा बेशुद्धावस्थेत गेल्यानंतर नातेवाइकांनी तिला रूग्णालयात दाखल केले असून संशयित आरोपींच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.


Spread the love