महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना गोंदिया येथे समोर आलेली असून एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे कार्यरत असलेल्या तसेच शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या एका 26 वर्षाच्या डॉक्टरने बावीस वर्षाच्या एका रूग्ण तरुणीवर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी उघडकीला आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, हडमक डोंगराला माली असे आरोपी तरुणाचे नाव असून गोंदिया तालुक्यातील गिरोला तासगाव येथील एक 22 वर्षाची तरुणी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. रुग्णालयात गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर अनेक शिकाऊ डॉक्टर तिथे आपली सेवा देतात.
गोंदिया तालुक्यात रजेगाव ग्रामीण रुग्णालयात पाच ते सहा शिकाऊ डॉक्टर कार्यरत असून हडमक हा अशाच पद्धतीने सेवा देत होता त्यावेळी त्याने रुग्णालयात रुग्ण म्हणून दाखल झालेल्या 22 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केला असून रावणवाडी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भा द वि 376 अन्वये गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.