‘ लिव्ह इन रिलेशनशिप ‘ मध्ये राहणाऱ्या महिलेच्या घरी तो आला अन ..

Spread the love

लिव्ह इन रिलेशनशिप महाराष्ट्रात तुरळक प्रमाणात असली तरी त्यातून गुन्हेगारीचे प्रमाण मात्र लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना उल्हासनगर येथे समोर आलेली असून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या एका तरुणाने मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सोबतच्या महिलेचे महिलेचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून केला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अनिल भातसोडे असे या युवकाचे नाव असून चिंचपाडा परिसरात ही घटना घडली आहे . विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अनिल हा फरार असल्याचे समजते.

चिंचपाडा येथे सुकन्या आव्हाड ही महिला आपल्या 17 वर्षीय मुलीसोबत राहत होती. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास मुलगी घराबाहेर उभ्या केलेल्या एका रिक्षामध्ये मोबाईल बघत असताना तिला आईच्या ओरडण्याचा आवाज आला त्यावेळी अनिल भातसोडे हा तिची आई सुकन्या हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होता. भातसोडे याने तिचे डोके भिंतीवर आपटल्याने तिचा मृत्यू झाला असे मुलीचे म्हणणे आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला ही भातसोडे याच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती मात्र त्यानंतर त्यांच्यात पटेनासे झाल्यावर तीन महिन्यांपासून ते वेगळे राहत होते मात्र तरीदेखील तो या महिलेला वेळोवेळी बोलून येत होता तसेच तिच्याही घरी जात होता. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो तिच्या घरी गेल्यावर त्यांच्यात भांडण झाले आणि त्यातूनच ही घटना घडली.


Spread the love