रेखाबाईला ‘ तसला ‘ मोह पडला महागात , पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

महिलांना असलेला सोन्याचा मोह हा काही कमी नाही मात्र यातून चक्क खून करण्यापर्यंत मजल जाण्याची घटना तशी दुर्मिळच म्हणावी लागेल. अशीच एक घटना जालना जिल्ह्यात समोर आली असून सोन्याच्या दागिन्यासाठी शेजारी राहणाऱ्या महिलेचा खून करणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रेखाबाई बाबुराव कोलपे ( वय 50 राहणार पानशेंद्रा तालुका जालना ) व भगवान विजयकुमार पाटील ( वय 31 राहणार मोदीखाना जालना ) अशी संशयित व्यक्तींची नावे असून त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. पान शेंद्रा येथील रहिवासी असलेल्या सुमनबाई माणिक जिगे ( वय 65 ) यांचा 11 मार्च रोजी बदनापूर तालुक्यातील साखरवाडी परिसरात मृतदेह आढळून आला होता. बदनापूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि तपास सुरू झाला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना एका खबर्‍या मार्फत माहिती मिळाली की 8 मार्च रोजी सुमनबाई या गावातील रेखाबाई कोलपे तिच्यासोबत गेलेल्या होत्या त्यानंतर पोलिसांनी रेखाबाई हिला ताब्यात घेतलेले असताना मयत महिलेने उसने घेतलेले पैसे परत दिले नाही म्हणून तिच्याबद्दल रेखाबाई तिच्या मनात राग होता. तिने हे पैसे मिळवण्याच्या उद्देशाने तसेच तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने चोरून घेण्यासाठी भगवान पाटील यांच्यासोबत सुमनबाई हिला मारण्याचा कट रचला अशी कबुली तिने दिली आहे.


Spread the love