महाराष्ट्रात पुणे येथे एक वेगळीच घटना समोर आली असून एका व्यापाऱ्याला 52 टन साखर देतो असे सांगून सांगली येथील एका साखर कारखान्यावर ट्रक बोलावून साखर दिलेली आहे असे सांगत या व्यावसायिकाकडून आठ लाख 12 हजार रुपये बँक खात्यावर घेण्यात आले मात्र त्याला कुठलीच साखर मिळाली नाही त्यानंतर त्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार शाम सादू गायकवाड ( वय 50 राहणार दिघी ) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादी गायकवाड हे व्यावसायिक आहेत तर सदर प्रकरणी आरोपी असलेल्या महिलेने त्यांना 52 टन साखर देण्याचे आमिष दाखवले होते. साखर देण्यासाठी या महिलेने सांगली येथील यशवंत शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड येथे गाडी पाठवून द्या, असे सांगितले.
गायकवाड यांनी दोन ट्रक तिथे पाठवल्यानंतर या दोन ट्रकमध्ये 52 टन साखर भरली आहे असे सांगून एका कंपनीच्या अकाउंटवर आठ लाख 18 हजार रुपये भरण्यास सांगितले. गायकवाड यांनी हे पैसे जमा केले मात्र तरीदेखील त्यांना साखर मिळाली नाही म्हणून त्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.