महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना गडचिरोली जिल्ह्यात कोरपणा येथे समोर आलेली असून एका दुसऱ्या व्यक्तीशी अनैतिक संबंध असलेल्या पत्नीने अडसर ठरत असलेल्या पतीचा गळा आवळून खून केला आहे. सोळा तारखेला रात्री अकराच्या सुमारास ही घटना कोरपणा तालुक्यातील पारधी गुडा येथे घडलेली असून पत्नी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, रमेश ननावरे ( वय 40 राहणार पारधी गुडा ) असे मयत व्यक्तीचे नाव असून सुरेखा ननावरे (वय ३८ ) असे पत्नीचे नाव आहे. रमेशच्या पत्नीचे परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते त्याच्यासोबत ती पळूनही गेली होती आणि आठ महिने त्याच्यासोबत राहिल्यावर ती पुन्हा रमेश यांच्याकडे नांदायला आली होती.
पती आणि पत्नी दोघांनाही दारूचे व्यसन असल्याने दारू पिल्यानंतर त्यांच्या सातत्याने भांडणे होत होती अशातच घटनेच्या दिवशी दोघेही पती-पत्नी आणि आणि पाच वर्षाचा मुलगा घरात असताना भांडणातून संतप्त झालेल्या पत्नीने पती रमेश याचा गळा आवळून खून केला. अल्पवयीन मुलाने ही घटना रमेश याचा भाऊ विजय ननावरे याला सांगितली आणि त्याने पोलिसात धाव घेत वहिनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.