नगर शहरात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस अंमलदार सोमनाथ बापू कांबळे ( वय 40 राहणार विळद तालुका नगर ) यांनी विषारी औषध प्राशन केले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
सोमनाथ कांबळे यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षात उल्लेखनीय अशा स्वरूपाची कामगिरी केली होती. बेपत्ता मुली, महिलांचा शोध घेण्यात आणि आणि अवैध मानवी वाहतूक प्रकरणात अनेक ठिकाणी केलेल्या कारवाईत देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी इमामपुर येथे विषारी औषध प्राशन केले होते मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली आणी त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असतानाच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून अद्यापपर्यंत मृत्यू बाबतची कागदपत्रे पोलिसांकडे देण्यात आलेली नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी देखील एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधलेला नाही, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी देखील दिली आहे .