महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना पुणे येथे उघडकीला आली असून पुणे शहरातील ताडीवाला रोड परिसरात राहणाऱ्या अकरा वर्षाच्या मुलीवर तिचे वडील, अल्पवयीन भाऊ, आजोबा, चुलत मामा अशा चार जणांनी सातत्याने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. बंडगार्डन परिसरात एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये समुपदेशन सुरू असताना मुलीने आपल्यावरील अत्याचारांची मालिकाच सांगितली आहे.
समुपदेशक महिलेने या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी पीडित मुलीचे वडील, भाऊ, आजोबा आणि चुलत मामा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकरा वर्षाची मुलगी ही एका शाळेत शिकत असून फिर्यादी समुपदेशक विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी शाळेत गेलेल्या असताना त्यांनी चांगला स्पर्श आणि वाईट हेतूने केलेला स्पर्श याविषयी मुलींना माहिती देत होत्या त्या वेळी या मुलीने गेल्या चार वर्षांपासून आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती त्यांना दिली.
मुलीच्या म्हणण्याप्रमाणे, 2017 मध्ये बिहारमध्ये असताना तिच्या वडिलांनी घरात कोणी नसताना तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये ही मुलगी ताडीवाला रोड येथे राहायला आली असताना 14 वर्षाच्या तिच्या मोठ्या भावाने तिच्यावर अनेकदा बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले आणि सदर घटना घटना कुणाला सांगितली तर मारून टाकण्याची धमकी दिली त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये आजोबांनी देखील तिच्याशी गैरवर्तन केले तर मी 2021 मध्ये तिच्याशी तिच्या चुलत मामाने देखील गैरवर्तन केले ‘ असे म्हटले असून बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.